STORYMIRROR

Satish Nahire

Inspirational

3  

Satish Nahire

Inspirational

महाराष्ट्र हा माझा

महाराष्ट्र हा माझा

1 min
193

अभिमानानं सांग गड्या तू आहे या मातीतला

छत्रपती शिवशंभू यांच्या पावन स्मृतीनं स्फुरलेला

शिक्षण, न्याय, समतेची वाट दावली देशाला

शाहू,फुले,टिळक,आंबेडकर यांच्या विचारानं घडलेला

ध्येयाप्रती तुझी आसक्ती निर्धारानं तुला घडवती

निधडी छाती बळकट बाहू सह्याद्री कडा सम तुला शोभती

भीमा, कोयना,पूर्णा,तापी झुळझुळ येथे वाहत गाती

निर्मळ कणखर तुझे मन हे जलाप्रमाणे विरक्त भासती

तुकोबांची अभंगवाणी जीवन फुलवीत राही

ज्ञानेश्वरीच्या संस्काराने प्रबुद्ध मन ही होई

एकनाथांच्या करुणेने हृदयी पाझर फुटे

सावता,चोखा, समर्थ, नामा जगण्यास प्रेरित करे

कोकणातील हिरवळ झाडी अथांग सागर गर्जतो 

पाच प्रांत असूनही एक आवाज निनादतो

महाराष्ट्र हा आपुला स्वाभिमान हृदयी हुंकार भरतो

जय जय महाराष्ट्र जयघोष गगनी बुलंद घुमतो

पोवाडे अन् लावणीची लज्जत येथे न्यारी

शाहिरांच्या शब्दाने रंगत चढते प्यारी

मराठमोळी, खानदेशी, वऱ्हाडी अन मालवणी

जात वेगळी,बोली वेगळी... पण साधी आमची राहणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational