STORYMIRROR

Satish Nahire

Inspirational

3  

Satish Nahire

Inspirational

जीवन - आरसा

जीवन - आरसा

1 min
176

आरसा हा आरसा असा कसा हा आरसा

जीवनाचे सार हेच, हाच जीवनाचा आरसा!!!


बाह्य रंगाचे गाई गोडवे, आंतरिक हे पार काळे..

सुकला ओलवा स्नेहाचा.... दांभिकतेचे डोहाळे 

वैभवाचे दर्शन येथे,रेलचेल पाल्हाळे 

चित्ती नसे शांतता,परी सुखाचे सोहाळे


नात्या नात्यातील गुफंण ,... अवघडलेले सारे..

कच्च्या धाग्याने तुटतात ,.. विश्वासाचे मजबूत धागे

 नाही नवलाई येथे, बंद मोकळीचे पहारे

 श्वास घुसमटतो तरी, वाहे मंद हास्याचे हे वारे


 क्षण सुखाचे विखुरतात,आशा उद्याची मावळते

 जगण्याची घोडदौड.,. कुण्या जाण्यानं न थांबते 

 बेसूर हे जीवन गीत, परी जगण्यास सांगते

 रडवलेल्या चेहऱ्याने, पुन्हा पुन्हा हसवते 

      रडवलेल्या चेहऱ्याने, पुन्हा पुन्हा हसवते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational