STORYMIRROR

Satish Nahire

Inspirational

3  

Satish Nahire

Inspirational

माणूस?

माणूस?

1 min
165

मी माणूस म्हणू स्वतःला

       की लाज वाटून घेऊ

मी दंभ करू ह्याचा

       की दांभिकेतेने पाहू?


महाभारतात जे घडले

       पतन तयांचे झाले

कलियुगात अब्रू ची लक्तरे

      उघडी का मग पडले?


रामायणतील पितृभक्ती

       बंधू प्रेमाची महती

क्षुल्लक राग,लोभाने

     विभक्त का सारे होती?


शौर्य, त्याग, बलिदानाने

      लढा देशप्रेमाचा लिहला 

स्वार्थाने बरबटलेली

    पिलावळ का येती जन्माला?

 

जगणं मुश्किल गरीबीचं

       विषमतेची खोल दरी

माणूसच येथील सैतान

     का माणुसकी ची कूस मारी?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational