मंगळागौरीचा सण
मंगळागौरीचा सण
आला आला हा श्रावण
सख्या आनंदल्या मनी
खेळू झिम्मा नी फुगडी
मंगळागौरीची गाणी
नवी नटली नवरी
केला साज वनश्रीचा
कुंकू हळद लेवूनी
रास मांडुया पूजेचा
आनंदाने नाचू गाऊ
खेळ खेळू जुने-नवे
थोडा विसावा मनाला
जमे आप्तगण सारे
श्रावनाच्या महिन्यात
रेलचेल ह्या सणांची
करू उपवास,भक्ती
वाढे चैतन्य मनाची
