मंद झुळूक
मंद झुळूक
1 min
7.2K
ती झुळूक वाऱ्याची येता,
का, गंध फुलांचा येतो|
मन धुंद होवूनी जाता,
मोगरा फुलोनी येतो||
केसात माळलेला,
का गजरा अजून ओला|
पावसात चिंब भिजलेला,
का चेहरा अजून ओला||
प्रीतीत धुंद झाले,
मिठीत नाहले मी|
धुक्यात पावसाचा,
हा थेंब जाहले मी||
ती झुळूक वाऱ्याची येता,
का, गंध फुलांचा येतो|