मनभावन श्रावण
मनभावन श्रावण
मनभावन श्रावण
झिम्मा उन पावसाचा
क्षणोक्षणी असा रंगतो
हा पुकारा निसर्गाचा
श्रावण धरेवर खेळतो...१
नभात येता कृष्णमेघ
रविकिरणे त्या चुंबिती
कवडशांचा येतो ओघ
ओल्या पानी चमकती...२
रंगीबेरंगी तेरडा डुले
इंद्रधनू जसे बांधावर
चमेली मोगरा फुले
सोनचाफा गं वेणीवर....३
रुणूझुणू मंद पद्न्यास
श्रावण सरीचा सुखवतो
संगे सणांचा मधुमास
अबालवृद्धा आवडतो....४
झोके टांगले झाडाला
दोर मेंदीरंगल्या हाती
पंचमीस लेकी माहेराला
सण सुखात भिजती...५
रेशमागत पुरणपोळी
पूजाप्रसादही आगळा
गौर खेळात जागली
आनंदे दिस रंगला.....६
उंच मनोरे तरुणाईचे
पोचे टांगल्या हंडीला
बालरूप श्रीकृष्णाचे
पाळण्यात अष्टमीला...७