रूपे तुझीच सारी
रूपे तुझीच सारी
1 min
150
पूर्वेस रोज येतो, जो लोहगोल मोठा
आम्हास प्राण देतो,ऊर्जेत तूच साठा...
देवा तुझ्या विना रे कोणी न अन्य त्राता
नामात मोद आहेभक्तीत दंग होता....
पाने फुले तरुंची, रंगीत भेट आहे
पक्षी सुरेल गाती, कंठाततूच आहे....
तिन्ही ऋतू क्रमाने, शिस्तीत बांधलेले
चंद्रास पाठवूनी रात्रीस गोड केले....
मातीत बीज वाढे, लाखात धान हाती
थेंबास मेघ वाहे बरसून दान जाती...
पुष्पात गंध आहे, वाऱ्यात नाद आहे
त्या गंध नाद रंगी, तल्लीन होत आहे...
येतील वादळे जी होतील जीवघेणी
देतील हात कोणी सारी तुझीच देणी...