चैतन्य
चैतन्य
1 min
176
गत सालाने जाताना,सवे नेली मरगळ जुनी
नववर्षाने येतायेता,संगे आणिली सळसळ नवी..
अरुणोदयी नवचैतन्य नित अवतरते विश्वात,
किलबिल करुनी खग पेरिती संगीत दिशात..
होता स्पर्श किरणांचा, मुकी कालिका फुले
परिसरावर सुगंधाचा,मधूर शिडीकावा करे..
पहाट होता चैतन्याचीकुरणी हिरे चमचमती
गवतफुलावर इवलालीफुलपाखरे भिरभीरती
खेदोपाडी घरातून कानी येते जात्याची घरघरत्या
तालावरती लहरत जाते, ओविची मंद लहर
विहीरीवर मोट चालते,सवे बळीराजा गातो
सर्जाराजा वेगे धावतो,पिकास पाणी देतो
लगबग चाकरमान्यांची,लक्ष जाय घड्याळाकडे
अवघ्या विश्वा चैतन्याची लागण, ते श्रेय जाय सूर्याकडे