Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anjana Karnik

Inspirational

3  

Anjana Karnik

Inspirational

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

1 min
177


स्वातंत्र्य देते आविष्काराची संधीह

हवं तस वागण्याची देखील धुंदी

काय नि किती भोगायचं स्वातंत्र्य 

याच्यावर मात्र जरा असावी बंदी....१


ओ टी टी वर अश्लील सिनेमे 

कोवळ्या मनाचा कब्जा घेतात 

कुविचाराचे बीज वाढू लागते

स्वैराचार बलात्कार फणा काढतात....२


व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम

वाचाळांची विवेकाहीन मुक्त्ताफळे

समाजास भडकावणे होऊन बेभान

चाललाय कोठे हा समाज न कळे....३


वाणी दिलीय देवाने गोड बोलावं

स्वातंत्र्य म्हणून वृथा का बोचकारावं?

स्वातंत्र्य दुसऱ्याचही जपायला हवं

स्वातंत्र्याला कर्तव्याच कोंदणं द्यावं....४


नको पशु पक्ष्याना वृथा बंदिवास

पिजऱ्यांतलं सुखही किती बोचत 

मोकळ्या नभात उडण्याची आस

हिरव्या रानात जगायचं असतं....५


स्त्री पुरुष राज्यघटनेपुढे समान

यांचे महिलांना मोठे समाधान

तरी पायदळी सदा जातो सन्मान

 स्वत्वासाठी द्याव लागत प्राणदान....६


स्वातंत्र्य वागणं लिहणं बोलण्याच

स्वातंत्र्य आहे सन्मानाने जगण्याच

पोटासाठी या जगभर हिंडण्याचं

जपू स्वातंत्र्य माझं तुमचं त्यांचं...७



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational