मनातील भावना
मनातील भावना
भावना माझ्या मनातील
मी कवितेत लिहित होते
कोण्या एका दिवशी कळेल तुला
असं मनाला समजवत होते
तू का सांगत नाही
तुझ्या मनातील भावना
थोडं तरी समजून घे रे
माझ्या मनातील वेदना
माझ्यावरती जीव तुझा
हे सगळ्यांनाच कळलं आहे
तू का बोलत नाही
हाच प्रश्न मनात आहे
सांगू कसं तुला आता
खेळ माझ्या मनातले
प्रेम कसं समजवू तुला
या परीच्या मनातले

