मनात राहुन गेलं!
मनात राहुन गेलं!
खुप काही सांगायचं होतं,
मनात जपलेलं गुपीत,
तुझ्याचपाशी उघडायचं होतं!
रेखीव ती चंद्रकोर,
तुझ्यासोबत पहायची होती!
चांदण्यांची मैफिल,
तुझ्या मिठीत भरवायची होती!
काजव्यांना सोबतीला घेऊन,
रातराणीच्या सुगंधात,
हातात हात घालून चालायचं होतं!
वार्याची मंद झुळूक आल्यावर,
हळुच तुला बिलगायचं होतं!
श्रावणातल्या चींब सरींत,
तुझ्यासोबत भिजायचं होतं!
डोळ्यांत डोळे घालून,
तुझ्या प्रितीच्या मोहजालात,
मला अडकायचं होतं!
तुझ्यात मला गुंतायचं होतं!
तुझ्या सोबत जगायचं होतं!
माझ्या आयुष्याच पुस्तक,
मला तुझ्या नावाने लिहायचं होतं!
आयुष्यभर तुझं होवून रहायचं होतं!
तुला माझं बनवायचं होतं!
पण नियतीपुढे काहीच नाही चाललं!
मनात रंगवलेलं स्वप्न,
क्षणभरात विरून गेलं,
सारं काही फक्त ,
मनात राहुन गेलं!!
मनात राहुन गेलं!!

