STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

3  

Meenakshi Kilawat

Romance

मनाच्या धाग्याने मी विणले

मनाच्या धाग्याने मी विणले

1 min
272

प्रितिच्या बंधनातून हे आयुष्य

काढले अन् काळजाने ते वेढले

बंध नाजुक कोमल असतात

मनाच्या धाग्याने मी विणले..


मनाला झुलवू नकोस आता

कर दुर हा दुरावा ग्रासलेला

रुजलेल्या या भावमनाला

ग्रहण नको आपल्या प्रेमाला.......


माझ्या जीवनातले कोडे असे

मज अद्यापही सापडत नाही

कशी मिठी सैल झाली अशी

अजूनही मज उलगडत नाही......


गुलाबी मनाची स्थिती माझ्या

खऱ्या प्रेमाचे देवून हे दाखले

कधी काय होईल या जीवनी

मज प्रीतरंग अभिनय भासले....


चंचल नयनांचा भ्रम असतो

चंचल वलये ही आयुष्यात

मिठी असावी मजबूत नेहमी

त्यात असावी विश्वात्मक जीत.....


सप्तरंगी रंगाच्या प्रितीची

अशीच असावी अदा न्यारी

जरी असली चौफेर वादळे

बांधुन मिठी चढावी पायरी.......


डोळ्यातील पाणी आवरून

पापण्या आड ही लपवायची

प्रित ही प्रथम फुलवायची

मग सैल मिठी घट्ट विणायची.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance