STORYMIRROR

Vanita Khandare

Tragedy

3  

Vanita Khandare

Tragedy

मन..

मन..

1 min
235

खूप दिवसांनी उघडलंय आज,

माझ्या मनाच कवाड..

मीही त्याला आड करण,टाळलंच,

कारण, मन आज ,भलतच झालय उनाड..


मनाचा कौल,आज मलाही उमजेना..

कोणत्या दिशेने वाहवत,चाललंय,

त्या दिशेचा,प्रवाह मलाही ओळखता येईना..


मन बहुतेक,आज वेगळच थैमान घालणार वाटतंय..

सारच, गुपित उघडीस येणार,

जे आजवर, मन अंतरात साठवतंय..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy