मन आभाळ जाहले
मन आभाळ जाहले
मन आभाळ जाहले
चिंब होऊनिया गेले
सख्या आनंद भेटीचा
मन हर्षे विसावले
पडे पाऊस अंगणी
पाने फुले बहरली
तुज पाहता साजणी
मन कळी मोहरली
विरहात कोमेजली
होती नाजूकशी काया
भेट होता तुझी माझी
लागे नजर बोलाया
उर भरूनिया आला
डोले मनाचे पाखरू
जणू विसावे कुशीत
सान आईच्या लेकरू

