STORYMIRROR

Suvarna Patukale

Tragedy

3  

Suvarna Patukale

Tragedy

मन आभाळ आभाळ

मन आभाळ आभाळ

1 min
320

मन आभाळ आभाळ त्यात दाटले हे मेघ

त्यात दाटले हे मेघ

आले भरून भरून पुसे काजळाची रेघ

पुसे काजळाची रेघ

मन आभाळ आभाळ.....

झाला अंधार अंधार, मन काजळले सारे

डोळा भरले हे पाणी, तिथे घोंगावले वारे

मन आभाळ आभाळ

होई वर्षाव वर्षाव, मेघ बरसती खाली

पापण्यांच्या कडा ओल्या,

सर गालावर आली

मन आभाळ आभाळ.......

थेंब टपोरे टपोरे मन होतसे मोकळे

आता रित्या मनामध्ये दिसे आकाश हे निळे

मन आभाळ आभाळ... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy