मला तुला सांगायचं आहे
मला तुला सांगायचं आहे
हृदयाच्या खोल सागरातलं
एक गुपित उघडायचं आहे
मनातलं अजून बरंच काही
मला तुला सांगायचं आहे.....
आशा अपेक्षांच्या हिंदोळ्यावर
स्वप्नवेल बहरायची आहे
माझ्या कल्पनेतलं तुझं विश्र्व
मला तुला दाखवायचं आहे.....
तुझ्या सोबतीच्या क्षणांच्या
आठवणींची पहाट व्हायची आहे
मन:पटलावरील तुझे चित्र
मला अजून रेखाटायचं आहे.......
नभीचा हा सांजतारा
अंतरी निवारा आहे
तुझ्या हृदयातील स्वर्ग माझा
मला तुला अनुभवायचा आहे.......
जन्मोजन्मीची तुझी साथ
अशीच मला हवी आहे
मनीच्या विचारांचे अजून
मनोमिलन व्हायचे आहे.........
आयुष्याचे शेवटचे पान
तुझ्याशी जोडायचे आहे
मनातले अजून बरंच काही
मला तुला सांगायचे आहे..........

