मला सोडायचे नव्हते
मला सोडायचे नव्हते
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
तिला जोडायचे नव्हते, मला सोडायचे नव्हते
गुलाबी रेशमी बंधन, कधी तोडायचे नव्हते
रुतावे काळजाला या अशी ती बोलली वचने
तिचे नाजूक हळवे मन, मला मोडायचे नव्हते
सुखाने चाललो होतो स्मशानी शांततेसाठी
जगाचे यम नियम सारे मला खोडायचे नव्हते
विषाचे घोट प्यालो मी कितीदा जीवनामध्ये
तरी खापर कुणावरती मला फोडायचे नव्हते
जिव्हारी लागले होते जरी बोलून ती गेली
तरीही पंडिता वचने तिचे खोडायचे नव्हते