मला समजून घेना....
मला समजून घेना....
मी रागावते, ओरडते, भांडते, त्रागा करते, अपेक्षा ठेवते, हक्क गावते, भरभरून बोलते.
पण 'मीच' गोंजारते, लाड करते, कित्येक चुकाही हसतहसत पोटात घेते, सगळ्यांच्या आवडीनिवडीही जपते.
आणि हो घरातील प्रत्येकाला सावरते, समजून -उमजून, माझ्या भरल्या संसारात सर्वांना सामावूनही घेते आणि आपलंसंही करते.
हे सगळं मी काही आईच्या उदरातून नाही ना आले शिकून; हे तर, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी नव्यानचं सारं फक्त 'तुझ्या-माझ्या' संसाराकरता पेलत आहे.
ह्या हिंदोळ्यावर झुलशील ना माझ्यासोबत!
ही सगळी तारेवरची कसरत करताना जर गेलाच जरा माझा तोल तर....
मला समजून घे ना...
