मला कविता व्हायचयं...
मला कविता व्हायचयं...
कोमल भावना अन अदभुत प्रेमाची व्याख्या व्हायचयं
एकदा तरी
माझ्या आवडत्या व्यक्तीची मला कविता व्हायचयं,
क्षुब्दता भेटीची अन प्रेमळ नजरेची भाषा व्हायचयं
एकदा तरी
माझ्या आवडत्या व्यक्तीची मला कविता व्हायचयं,
गंध प्रितीचा अन अतुट नात्याची साथ व्हायचयं
एकदा तरी
माझ्या आवडत्या व्यक्तीची मला कविता व्हायचयं,
शब्दा-शब्दातुन झळकणारे प्रेम अन दिसणारी काळजी व्हायचयं
एकदा तरी
माझ्या आवडत्या व्यक्तीची मला कविता व्हायचयं,
ओळीतुन व्यक्त होणारी प्रार्थना व्हायचयं,
प्रत्येकक्षात न कळणार्या पण कवितेतुन व्यक्त होणार्या
भावना व्हायचयं,
परिच्छेदातल्या शब्दाला कवटाळुन खास वाटुन घ्यायचयं
एकदा तरी
माझ्या आवडत्या व्यक्तीची मला कविता व्हायचयं,
डोळ्यातल्या आसवांना भिजवायच आहे अन
आत्म्याला प्रेमाचा पुरावा द्यायचयं
फक्त एकदाच
माझ्या आवडत्या व्यक्तीची मला कविता व्हायचयं...