STORYMIRROR

Latika Choudhary

Abstract Others

2  

Latika Choudhary

Abstract Others

मला कळेना

मला कळेना

1 min
13.1K


झाली सुखें कशी ही नावे मला कळेना

का गीत वेदनांचे गावे मला कळेना

माझ्या सभोवताली जोखड परंपरेचे

नभ गाठण्या कसे मी जावे मला कळेना

त्याची सुखे गुलाबी आभास होत गेली

का यातना शराबी भावे मला कळेना

आयुष्य वेचले मी घेऊन वीज हाती

अंधारल्या ढगांनी न्यावे मला कळेना

सन्मान हार त्यांचे मंचावरी मिळाले

वस्तीत लांडग्याचे चावे मला कळेना

मेंदूत माणसांच्या,गर्दीत श्वापदांच्या

का माणसाळलेले छावे मला कळेना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract