मिठी सैल झाली
मिठी सैल झाली
रात पहिली लग्नाची
सखी आतुर प्रेमाची
दोन घटकेचा वेळ
प्रिय आस मिलनाची
येता समोर लाजली
हळु मान तिची खाली
वर करता मान हो
खळी गालात हो आली
रुप निखळ सोवळे
चंद्रा परी ती चांदणी
उजळुनी जीवनी या
आज होऊन संगिनी
घेता मिठीत हसली
ह्दयात ती भिनली
मिठी सैल झाली अशी
पुन्हा मिठीत ती आली
बोल मधुरा कोकीळा
गीते मुंजुळ ऐकली
साथ प्रेमाची सजनी
अशी ती झणकारली
सैल मिठीत ती रात्री
परी माझ्या मनी अशी
तिला बघण्यात माझी
जागे मग रात्र अशी

