मित्रा!
मित्रा!
असा कसा मित्रा,तू चालला सोडूनी
डाव माझ्या मैत्रीचा, तू चालला मोडूनी
तुझ्याविणा पोरका झालो मी आता
कोसळतो मीच आत, टाहो हा फोडूनी
सांग गड्या अर्ध्यावरी, का सोडलास संग?
तू दिल्या वचनांचा, रे का केलास भंग?
का ठेवलेस पुढे, दुःख तूच वाढूनी?
असा कसा मित्रा, तू चालला सोडूनी...
हाक कुणा मारू, साद घालू मी कुणा?
खरे सांग मित्रा! मी केला काय गुन्हा?
आज तुझ्या आठवणींनी, गेलो मी वेढूनी
असा कसा मित्रा, तू चालला सोडूनी...
दिस तुझ्या संगतीचे, आठवते मला आज
असा कसा आज तुला, फुलांचा रे साज?
असे कसे स्वप्न माझे, चाललास जाळूनी?
असा कसा मित्रा, तू चालला सोडूनी...