STORYMIRROR

Liladhar Dawande

Others

3  

Liladhar Dawande

Others

उतराई

उतराई

1 min
72


बहिणीच्या मायेची मी

कशी करू उतराई

तीच माझा भाऊ झाली

अन् तीच माझी आई


माझ्यासाठी बहिणीने

केले रे काबाडकष्ट

लागू नये नात्यांस या

कधी कोणाची रे दृष्ट


शिक्षणास माझ्या तेव्हा

होता तिचाच आधार

माझ्या आयुष्याला गड्या

दिला तिनेच आकार


बंध रेशमाचे जुने

आहे टिकून तसेच

माझ्या डोईवर तिचे

छत्र राहावे असेच


सण आला रे राखीचा

तिला भेटण्याची घाई

बहिणीच्या मायेची मी

कशी करू उतराई


Rate this content
Log in