भेटील पुन्हा
भेटील पुन्हा
सोडू नकोस मोकळा
सखे,केसांचा साज तू
कोमेजल्या पाकळ्यांना
फुलवू नको आज तू
मावळत्या सुखांचे
छेडू नकोस तराणे
अडखळले शब्द हे
गाऊ नकोस सुराने
विरले ते शब्द सारे
मावळतीची सांज उरे
भोगलेले दुःख गडे
या जन्माला मज पुरे
फक्त अशी पुढे रहा
बघून घेतो मनसोक्त
साठवूनी शब्द शब्द
करील म्हणतो मी व्यक्त
देहावरी उरल्या आता
उतरंडीच्या खाणाखुणा
स्मृती माझ्या जपून ठेव
भेटील नव्या जन्मी पुन्हा