ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
32
भेगाळल्या भूईलाही
ओढ पावसाची लागे
जाई मोहरून कधी
मनी गुंफलेले धागे
दाह तिच्या अंतरीचा
कुणा कळेना कधीच
नभ भेटीचा दुरावा
तीने सोसला आधीच
स्वप्न हिरवं मनात
भूई घेऊन जगते
दान पावसाचं नभा
जरा लाजून मागते
मेघ दाटता नभात
हर्ष धरणीला होतो
पूत्र धरणीचा बळी
गाणं पावसाचं गातो
मेघ पाहता दुरून
स्वप्न आशेचे रे जागे
भेगाळल्या भूईलाही
ओढ पावसाची लागे