बोगणवेल
बोगणवेल
1 min
11.6K
नक्षत्राचे दैवी चांदणे
की, जणू मदन रंगेल
देहावरती फुले फागवा
भूल पाडतो बोगणवेल
उन्हं सांडती सोनकेशरी
परी फुलांचा साज उरी
मोह मनाला सुटतो क्षणभर
कवटाळूनी हृदयी धरी
गंध नसेना जरी जरासा
डौल फुलांचा असे निराळा
स्वर्गामधल्या पथास साजे
शुभ्र, केसरी बोगणमाळा