STORYMIRROR

Vijay Kadu

Inspirational

3  

Vijay Kadu

Inspirational

मीच माझ्या मनाशी

मीच माझ्या मनाशी

1 min
207

मीच माझ्या मनाशी

बोलत राहावे

जुन्या आठवणी कुरवाळत

कधी अश्रू ढाळावे !!१!!


मीच माझ्या मनाशी 

समजूत घालावी

सुखद प्रसंग आठवून

गालात हसावे !!२!!


मीच माझ्या मनाशी

प्रश्न करावे 

उत्तर शोधण्यासाठी

भुतकाळात जावे !!३!!


मीच माझ्या मनाला

दुःख द्यावे

दुसऱ्याच क्षणी त्याचे

सांत्वन करावे !!४!!


मीच माझ्या मनाशी

उज्ज्वल भविष्याचे

स्वप्न पाहावे, त्या स्वप्नात

आसमंती रमावे !!५!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational