STORYMIRROR

Ishwari Shirur

Inspirational

3  

Ishwari Shirur

Inspirational

मी राजमाता जिजाऊ...

मी राजमाता जिजाऊ...

1 min
11.4K

क्रांतिनंतरची उषःकाल आज नव्यानेच पाहिली होती 

धकाधकीच्या जीवनात माझी जयंती तेवढी लक्षात होती 

मग मीच, समाजाशी बोलावे म्हणून स्मरला भूतकाळ माझाच 

कोण मी? स्वतःशीच म्हणत, आज चाळले पुस्तक इतिहासाचे, 

पुन्हा आठवल्या त्या गर्द आठवणी कलियुगाच्या पसार्‍यात... 


राष्ट्रमाता, राजमाता, जाधवांची मी जिजाऊ, 

अराजकतेच्या पार्श्वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्याचं स्वप्न मी जिजाऊ

लहानपणीच युद्धकला राजनितीत परिपक्व 

चूल आणि मूल नाही तर तलवार आणि भाला माझं तत्त्व...


आज या शिवराज्यात असंख्य औरंगजेबाचा उच्छाद मांडलाय, 

माझ्याच भूमीत आज माझी आई बहीण बळी जातेय.... 

मराठी अमराठी वाद तर सगळीकडेच मांडलाय, 

सुधारणेने जणू आता परकीय विजा कायमस्वरूपी काढलाय

टेबलाखालून खाऊन राजकारणाने सारा खेळ मांडलाय, 

हिरवा, केशरी वादात अख्खा भारत आज गुरफटलाय... 


कसं सांगू आता तुम्हाला, तुम्ही माझीच तर लेकरे आहात... 

आपण परावलंबी नाही, तर शिवछत्रपतींचे स्वावलंबी मावळे आहात... 

धाडसाचे बीज पेरुन निरोप घेते आता, 

पुन्हा येईन मी एका उषःकाली तुम्हास भेट द्यायला, 

तेव्हा घराघरांत वावरेल जिजाऊ राजमाता...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational