मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन
आहे मी खट्याळ असा
दिशा साऱ्या बदलवीन
विनोद सांगून हसवण्या
मी पुन्हा येईन ||१||
विनोदाचा बादशहा मी
विनोदाच्या राशी लावीन
खळखळून हसवण्या
मी पुन्हा येईन ||२||
रचले विनोदी किस्से
वाचण्या घेऊन येईन
साठवून ठेव थोडं हसू
मी पुन्हा येईन ||३||
विनोदी कलाकारांचे
विनोदी किस्से आणीन
हसवून आयुष्य वाढविण्या
मी पुन्हा येईन ||४||
संपले विनोदी किस्से
मी नवे तयार करीन
पण तुम्हा सर्वांना हसविण्या
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ||५||
