STORYMIRROR

Swati Damari-Masurkar

Inspirational

3  

Swati Damari-Masurkar

Inspirational

"मी नारी" - तरीही का नकोशी मी

"मी नारी" - तरीही का नकोशी मी

1 min
870



*मी नारी.........*


माय मी अनुजा ही मी

मीच भगिनी, भार्या ही मी


तरीही का नकोशी मी?


संयम मी चंचला ही मी

मीच धीर, धैर्यवान ही


तरीही का नकोशी मी?


मान मी मर्यादा ही मी

मीच शान, आनबान ही


तरीही का नकोशी मी?


निष्ठा मी, प्रतिष्ठा ही मी

मीच अब्रू, बेअब्रू ही


तरीही का नकोशी मी?


लाज मी लज्जा ही मी

मीच प्रीती, सती ही मी


तरीही का नकोशी मी?


शक्ती अबला ही मी

मीच रुद्र, वत्सला ही मी


तरीही का नकोशी मी?


काली मी दुर्गा ही मी

मीच लक्ष्मी, सरस्वती ही मी


तरीही का नकोशी मी?


श्रेष्ठ मी शूद्रा ही मी

मीच संसार, विनाश ही


तरीही का नकोशी मी?


आदी मी अनंत मी

काल, आज, उद्या ही मी


तरीही का नकोशी मी?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational