STORYMIRROR

Swati Damari-Masurkar

Romance

3  

Swati Damari-Masurkar

Romance

का रे दूरावा......

का रे दूरावा......

1 min
334

तुझ्या पैंजणांचा नाद

जिवा खुळवुनी गेला

सखे विरहात तुझ्या

जीव व्याकुळ ग झाला


तुझ्या डोईचा तो सुर्य

माझ्या हृदयास जाळी

तुझ्या नजरेचा तीर

मला घायाळ ग करी


तुझे काळेभोर केस

त्यात खट्याळ ती बट

छळूनी ग करू पाहे

माझ्या जीवाशी लगट


तुझ्या भेटीची ग ओढ

करी मिनिटाचा तास

आता सोसवेना मला

तुझ्या विरहाचा त्रास


मना खूणावुनी जाई

तुझा स्पर्श तुझा गंध

मी ग माझ्यातही नाही

झालो पुरता बेधुंद


तुझ्या मुखाचा चंद्रमा

तुझं हसणं चांदणं

वेड लावी जिवा माझ्या

त्यात ओली सांजवेळ


कधी येशील तू सखे

नको पाहू असा अंत

माझा व्याकुळला जीव

त्यात वैरीन ही रात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance