Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swati Damari-Masurkar

Others

5.0  

Swati Damari-Masurkar

Others

आई

आई

1 min
477

किती ऋणी मी असे ग जननी, नच ठावे कुणा न सांगेकुणी ।। 

बालपणी तू मज रक्षीयले,

अहिर्निश तू मज संभाळीले ।।

उपकरांचा विशाल पर्वत,

असे ग माझ्या स्मरणी।।

किती ऋणी मी असे ग जननी, नचठावे कुणा न सांगे कुणी ..... 

सन्मार्गाचा दीप दावीशी,

प्रमाद माझे किती सोसशी।।

देखोनी तव मातृहृदय,

परमेशही तोषे मनी।।

किती ऋणी मी असे ग जननी, नचठावे कुणा न सांगे कुणी ..... 

पुत्ररत्नांचे कांडन करीता,

सती चांगुणा मनी रुदिता।

भिक्षुकाचे रूप त्यार्जुनी,

अवतरला त्रिशूलपाणि।

कितीऋणी मी असे ग जननी, नचठावे कुणा न सांगे कुणी ..... 

तक्षक दंशता रोहिदासा,

रडे वनी माय ढसाढसा,

मातृत्त्वाला तडा न देता,

करी इशधावा स्मशानी।

किती ऋणी मी असे ग जननी, नचठावे कुणा न सांगे कुणी ..... 

थोर असे माते महती,

तुझी तिन्ही लोकी पुजती,

स्वामी तिन्ही जगाचा,

भिकारी तुजवीन जननी।

किती ऋणी मी असे ग जननी, नचठावे कुणा न सांगे कुणी ..... 

कशी होऊ ग ऋणमुक्त मी,

न फिटती ऋण जन्मोजन्मी,

उभीसेविका सेवेसाठी,

लीन होण्या तवचरणी।

किती ऋणी मी असे ग जननी, नचठावे कुणा न सांगे कुणी ..... 

Rate this content
Log in