STORYMIRROR

Swati Damari-Masurkar

Romance

4  

Swati Damari-Masurkar

Romance

प्रणय बहर...

प्रणय बहर...

1 min
457

येई प्रणय बहर, हृदयी वसंत

करी कोकीळ कुंजन, नाद नभात

छेडी राग मधुवंती, मुग्ध आसमंत

बेफान होऊनी, मन मग्न रासलीलात


वेडलावी जिवा, प्रीतीचा छंद

मनवेडे भ्रमर, शोधी मकरंद

प्रणय रस प्राशण्या धुंद

प्रेमपाशात होई बंद, बेधुंद


जिवा एकध्यास लागो तव संग

स्मरता तुज का खुलले अंतरंग

झलक तव, जणू बासुरी वाहे मंद

दरवळे वाऱ्यावरी नवप्रितीचा गंध


गुंतती नयन, तोडोनी पाश बंध

तीर प्रेमाचा घेई काळजाचा भेद

स्पर्श अलगद, मती होई गुंग

थबकती क्षण सारे, होता प्रेमाचा संग


खुले कळी तव स्पर्श होता बेधुंद

सहवास तव जणू स्वर्गीय आनंद

काहूर उगा दाटे मन होता स्वच्छंद

आळवुनी प्रेमराग तोडीले सारे भवबंद


अंतरीची ओढ आज जाई पूर्णत्वास

सरली प्रतीक्षा, शृंगार सजे तो खास

जन्मोजन्मीचे फुलले नाते भिजूनी प्रेमरसात

प्रीतीला नव पंख मिळाले होई मुक्त नभात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance