STORYMIRROR

Atharv Mahajan

Tragedy Others

3  

Atharv Mahajan

Tragedy Others

मी मूक ठरेल...

मी मूक ठरेल...

1 min
320

मान्य आहे मजला

माझी ती चूक झाली,

तुझ्याकडे दुर्लक्षण्याची

माझी अक्षम्य भूल झाली.


तूच सांग आता

प्रायश्चित्त या गुन्ह्याचे,

काय करावे मी

प्रयत्न तुला मनावण्याचे.


तूच आहेस ना

वाट माझ्या जगाची

कामना तू माझ्या मनीची,

हळूवारशी साद तू

या केवील ह्रदयाची.


साहित्याचे परीकाव्य तू

क्षणभंगुर असे सौख्य तू,

सौंदर्याची अजान तू

अंत नाही अनंत तू.


राग धर द्वेष नको

अबोल हो नि:शब्द नको,

साथ सोड स्पंदने ठेव

सूर सोड स्वर नको.


तू साथ सोडली

मी अजीव ठरेल,

तू शब्द चोरले

मी मूक ठरेल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy