STORYMIRROR

Janhavi kumbharkar

Inspirational Children

3  

Janhavi kumbharkar

Inspirational Children

मी लहान असताना

मी लहान असताना

1 min
102

आता भरपूर वेळ आहे बालपणात रमायला 

रम्य त्या आठवणी पुन्हा एकदा जगायला 


सगळंच किती छान होतं मी लहान असताना 

खूप मैत्रिणी खूप मज्जा दिवसभर खेळताना 


घरात कमी मैदानात जास्त अशी आमची गत होती 

जेवणा आणि झोपण्यासाठी घराची तेवढी गरज होती 


पतंग, भवरा, लगोरी, विटी-दांडू सारेच आम्ही खेळायचो, 

दमून भागून दिवसभर रात्री लवकर निजायचो 


सुट्टीत घरी बसलेलं मला काही आठवत नाही, 

भातुकलीच्या खेळातील भांडण काही सुटत नाही 


शाळेमधल्या बाकांवरती खूप मन रमायचं, 

सर्व स्पर्धा, नृत्य, नाट्य तेव्हा सर्व जमायचं 


आता मनाचे फुलपाखरू पुन्हा अलगद उडू लागले, 

पुन्हा पुन्हा शाळेमधल्या बाकांवरती बसू लागले 


किती मोठा खजिना होता मित्र-मैत्रिणींचा, 

सारंच कसं सोपं होतं बालपणी आमच्या 


काळजी, चिंता, बजेट, पैसा काहीच आमच्या कक्षेत नव्हतं, 

मजा, मस्ती, अभ्यास, धमाल एवढंच काय ते माहित होतं 


आता सारंच बदललंय वेळ मिळत नाही, 

पूर्वीसारखे मित्र-मैत्रिणी आज भेटत नाही 


असं वाटतं पुन्हा एकदा लहानगे व्हावे, 

तरुणपणाच्या वाटेवरती बालपण जपावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational