मी इश्काच्या दरियात पोहते
मी इश्काच्या दरियात पोहते
आग ही आग माझ्या अंगात आग
ह्या आगाशी मी झूंंझळते
पावन टकमक पाहू नका
मी इश्काच्या दरियात पोहते ।।
मी आली नऊवारी नेसून, शोभते नऊवारी भरून
डोळ्यात काजळ पायत पैंजण, वाजत लय नाचतानं
कमरी पट्टाला तुम्ही पाहून, लाजली मी पावनं
माझा पदरला हात, पाटील देतो मला हाक
माझ हृदय धडधडते
पावन टकमक पाहू नका
मी इश्काच्या दरियात पोहते ।।
माझ चांदेरी सोनेरी रूप,
भांग चढला पाटीलां खूप
पाटीलचा लय मोठा रूबाप,
पाटीलच पेेेरेम माझ्यावर खूूप
मी रूपाची खान, पाटील वाढवतो शान
माझी पापणी फडफडते
पावन टकमक पाहू नका
मी इश्काच्या दरियात पोहते ।।
