मी एक खंबीर स्त्री आहे..
मी एक खंबीर स्त्री आहे..
जीवनाच्या प्रत्येक अध्यायात मी एक धडा आहे..
परिणामांची पर्वा न करणारी मी एक खंभीर स्त्री आहे
प्रत्येक पानावर त्याने द्यावे एक नवे आव्हान मजला
काळासही परास्त नाही अशी मी एक नारीशक्ति आहे..
कष्टांची सांगड घातली नशिबी तरी खचले ना कधीही
आयुष्याचीहोळी करूनी ही रूजवले ऊद्याचे भविष्य
आज उद्याची भ्रांत असे निरंतर प्रयत्नांची पराकाष्ठा
नव्या दिवशी नवी आव्हान पेलायला तरी सज्ज झाले..
शून्यातून जग निर्माण होईल, संसारात आपलं ही कोणी असेल..
नसते शाश्वती कधी श्वासांची, रक्ताची नाती कशी निभावतील ती ..
होतेच कधी शिकस्त माझी ती हार असे माझ्या मायेची..
असे कठोर तेवढीच निग्रही, असो संघर्ष संसारी वा जीवनी...
प्रसंगी हार आली पदरात पचवली ती ही हरिणी होऊनी
संसाराचा रहाटगाडग फोल ठरले नेहमीच माझ्या विना..
जगी सुखावले चांदण्या नक्षत्रांचे देणं माझ्या विना सर्व व्यर्थ
मी असे जागृत अंतरात्मा प्रत्येक पानावर एक आव्हान मज
अशी लढवैया जगजैत्या जंगदंबेची स्वरूप जपले मी
पेलते ती जशी होऊनी प्रसंगी कणखर अशी आई आहे मी
जीवनाच्या प्रत्येक अध्यायात मी एक धडा आहे मी..
परिणामांची पर्वा न करणारी मी एक खंबीर स्त्री आहे
