मी एक बाप आहे
मी एक बाप आहे
मी बाप आहे ग तुझा
तू माझी चिऊताई
पंख तुझे अजून कोवळे
का करते उडण्यास घाई
हे जग नसे इतके
वाटते तुला जे सोपे
जो गोड बोलून टाके दाणे
तोच पंख तुझे कापे
प्रेमाच्या जाळ्यात अडकून
करतेस घात अपुला
परक्या पोर खातिर
म्हणतेस वैरी बाप अपुला
काहीही बोलली तरी
आशिष तुला देत आहे
श्रापणार नाहि कधी तुला
शेवटी मी एक बाप आहे