STORYMIRROR

purushottam hingankar

Inspirational Others

3  

purushottam hingankar

Inspirational Others

महत्व पर्यावरणाचे

महत्व पर्यावरणाचे

1 min
198

हरित क्रांतीचा दिन 

पर्यावरण हे सारे 

श्वासागणिक मानवा 

तू जाणून घेशी बा रे.. //१//


राष्ट्र सुदृढ होण्या

आरोग्याचा मूलमंत्र

झाडं लावूनी करावे

अभिनंदन सर्वत्र....//२//


ते देई शीतल छाया

पर्ण फुलं आणि फळे 

जीवनी तापतो तेव्हा

झाडाची महती कळे...//३//


पर्यावरण रक्षण

जेव्हा मानव करेल 

निसर्गाचा कोप हा रे

तेव्हाची बा रे टळेल....//४//


सुंदर हे आयुष्य बा

तुझ्याच हाती रे आहे

झाडं न लावता एक

मरण अटळ आहे.....//५//


म्हणूनी एक ते लावी

झाड जगी तू सकळ

ऑक्सिजनची महती

कोरोना सांगे सकळ...//६//


त्यातूनी वाचवी तुला

पर्यावरण सकळा

सांगतसे भावे लोकां

संतदास हा सकळा......//७//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational