STORYMIRROR

Mrudula Raje

Inspirational Others

4  

Mrudula Raje

Inspirational Others

महाराष्ट्राची संस्कृती

महाराष्ट्राची संस्कृती

1 min
366

महान माझ्या महाराष्ट्राची, अतिमहान संस्कृती।

अभिमान वाटे मज तिचा, मी थोरवी वर्णावी किती॥


ज्ञानेश्वरांनी रचला पाया, माझ्या मायमराठीचा। 

वाळवंटी पंढरीच्या गजर चाले विठूनामाचा॥


शिवरायांचा महाराष्ट्र म्हणजे स्वप्न हिंदवी स्वराज्याचे।

भारतभूमीवर उगवलेले फूल एक सौभाग्याचे॥


लोकमान्य टिळकांनी केले श्रीगणेशाला सार्वजनिक।

मराठी संस्कृतीचे दर्शन घडले विश्वाला सामूहिक॥


जेजुरीचा खंडेराया, आराध्य दैवत महाराष्ट्राचे।

शिवरायांना तेज देती, आशीर्वाद भवानी मातेचे॥


विष्णुदास भावे लावती बीज मराठी नाटकांचे ।

साहित्य, संगीत, चित्रपटांनी जग जिंकले दृक् कलेचे॥


काव्य, शास्त्र, विनोदाचे, क्रीडा आणि चित्रकलेचे।

जगाच्या नकाशावर नाव अमर महाराष्ट्राचे॥


भक्ती, शक्ती, युक्ती, जेथे एकवटली एकचित्ती।

नमन माझे सदैव तुजला, थोर माझ्या मराठी संस्कृती॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational