STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

महाराष्ट्र

महाराष्ट्र

1 min
226

अरे महाराष्ट्र माझा, असे राष्ट्र महान

देशाची अमुच्या, उंचावे नेहमी शान


डोंगर, कड्या कपारी, किल्ले गडकोट

माझ्या मराठी अस्मितेचा आगळाच थाट


शिवाजी, लोकमान्य, ज्योतिबा आंबेडकर

या मातीतच जन्मली, नररत्ने ही थोर


सावित्री, जिजाऊ, आनंदी, झाशीची राणी

ऐकू येई घरोघरी, मुक्ताई, जनीची वाणी


वि.वा., वि.स., प्र.के, पु.ल. साहित्यिक थोर

ज्ञानोबा, तुकाराम, समर्थांची वाणी रे प्रखर 


घोंगावतो हा रान वारा, गंध मातीचा घेऊन

पसरली किर्ती दूरवर, माझा महाराष्ट्र महान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational