Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Medha Desai

Tragedy

3  

Medha Desai

Tragedy

महापूराचे थैमान

महापूराचे थैमान

1 min
655


यावर्षीचा तो पाऊस जीवघेणा

थांबण्याचे नावही घेत नाहीये

सगळीकडे हाहाःकार माजवून

माणसांची दशा करून ठेवलीये १


पुण्यामध्ये ढगफुटी करून ओथंबलेला

माणसे,गाड्याही वाहून नेत राहिला

अगदी जिवाच्या आकांताने बरसलेला

त्यामुळे ओला दुष्काळ सर्वांनी पाहिला २


मुंबईचा तो पाऊस अवाढव्य बरसला

संकटांमुळे चांगलीच दमछाक करणारा

जनजीवन विस्कळीत करूनही

साठलेल्या पाण्याने रोगराई आणणारा ३


कोल्हापूर,सांगलीचा तो पाऊस महापूराचा

अंबाबाईलाही नखशिखांत बुडवणारा

त्यातूनच माणुसकीने लोकांना मदत करून

जवानांच्या रूपाने देवाचे दर्शन घडवणारा ४


आता पुरे झाला तो पाऊस अनागोंदी

अनोळखीपणे रस्त्यांवर खड्डे करणारा

मैत्रीचा हात देऊन माणुसकीने मदत करत

संकटसमयी धावून सर्व जगाला एकत्र आणणारा ५


Rate this content
Log in