STORYMIRROR

SANJAY SALVI

Tragedy Others

4  

SANJAY SALVI

Tragedy Others

मेरा देश महान !!

मेरा देश महान !!

1 min
263

जिकडे तिकडे होर्डिंग आणि पोस्टर,

राजकारण्यांची लागल्यात जणू वेशीवर लक्तर,

निवडणूक येता मागतात जोगवा,

प्रचार सभा आणि भाषणांचा गवगवा,

दोन वेळच्या जेवणाची ज्यांना असते मोदाद,

नगरसेवक होताच पैसे खोऱ्याने ओढतात,

आजचा नगरसेवक उद्याचा  आमदार,

निवडून न येता होतात कोट्याचे खासदार,

पाच वर्ष भोगतात उभी-आडवी सत्ता,

मतदार संघाचाच यांना नसतो पत्ता,

सत्ताधारीही तसे आणि विरोधकही तसले, जनतेसमोर म्हणतात आम्ही नाही त्यातले,

जनताही शांतपणे बघते

तमाशा,

संवेदना साऱ्यांच्या झाल्यात नाहीशा

मतदार राजाची फक्त एका दिवसाची शान,

उरलेले सारे दिवस मेरा देश महान !!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy