STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

3  

Sunita Ghule

Inspirational

मेघ पावसाळी

मेघ पावसाळी

1 min
457

मेघ पावसाळी नभी

नभी जलधिचा खेळ

अनुपम देखाव्याची

देखाव्याची रानभूल।


हर्षे भेगाळली धरा

धरा तृषार्त चातक

मेघ पावसाळी डोई

डोई जल अभिषेक।


येता पर्जन्याची सर

सर भिजविते चिंब

मोरपिस फुलोऱ्यात

फुलोऱ्यात रानबंध।


मेघदूता आमंत्रण

आमंत्रण भेटीसाठी

बळीराजा आबादानी

आबादानी काळी माती।


मेघ पावसाळी नवा

नवा अंकूर आशेचा

सप्तसूर हिरवाई

हिरवाई सृजनाचा।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational