मदतीचा हात
मदतीचा हात
माणुसकी दिसली देवा
तुझ्या मदतीच्या हातात
जीव एकटा भुकेला
मोजी पैशाच्या ताटात
अशी ही दुनिया सारी
भुकेला ना दिसे त्यास
गेली कशी नीती यांची
जिर्ण डोळ्यांची आस
दुःखी माझे मन
पाहून ही कळा
कसे सावरू देवा
माणुसकीचा लळा
पैशासाठी जीव भुकेला
किमतीत भूक मोजी
धन्य देवा तुला माझे
माणसात देव धाडी
देवा एकच मागणे
जिथे दिसे अनाथ
बाल वृद्ध अपंग
दे मदतीची साथ
