STORYMIRROR

Surekha Nandardhane

Romance

3  

Surekha Nandardhane

Romance

मैत्रीच्या पलीकडे

मैत्रीच्या पलीकडे

1 min
170

मैत्रीच्या पलीकडे प्रेमाच्या अलीकडे

दिवस असला सोबत जरी रात्र स्वप्नांची न पुरे

रात्र दिवस संवाद आपले तरी पडती क्षण अपुरे

क्षण सोबतचे आठवी मन मन हे त्यातच वेडे ।।


वाद घालतो पण झाला जीवाचा जिवलग 

तिच्यासाठी तू तर त्याच्यासाठी तूच हे जग 

नातं प्रेमाचं अतूट जुळलं थोडं आंबट थोडं गोड

मैत्रीच्या पलीकडे प्रेमाचं हे नातं जाऊन बघ ।।


हाय म्हणताच मनाला चुटकी सारखी चाहूल देणारी

बाय म्हणताच निरागस पणे मनाची समजुत काढणारी

 हळूच येऊन कानात लव्ह यु बोलत बडबडणारी

ओठांवरती स्मित हास्य आणून त्यात रमणारी ।।


डोळ्यात पाणी आणून मन हळवे करून टाकणारे ते क्षण

निरागस त्या क्षणाची राहून राहून येते आठवण

कधीच पुसले जाणार नाही ते आठवणीतील क्षण

सुख दुःखाच्या क्षणाची हृदयात राही नेहमी साठवण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance