STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

मैत्रीची भावना

मैत्रीची भावना

1 min
243

 मैत्री तुझी आणि माझी 

त्याची सर नाही कुणाला 

प्रत्येक क्षणी आस लागे 

तुज भेटण्याची मजला 


मैत्री तुझी आणि माझी 

जणू ऊन आणि पाऊस 

सोबत राहू दे कायम 

हीच जगण्याची हौस 


मैत्री तुझी आणि माझी 

जशी मन आणि भावना 

व्यक्त करण्या काही न लागे 

समजून घेई सर्व यातना 


मैत्री तुझी आणि माझी 

जणू सप्तसुरांची साथ 

जिथे शब्द माघार घेता 

कायम राहू दे सोबतीचा हात 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract