STORYMIRROR

komal Dagade.

Inspirational

3  

komal Dagade.

Inspirational

#मैत्री...

#मैत्री...

1 min
223

मैत्रीच नातं हे कोणत्याही नात्यापेक्षा वेगळच असतं, ह्यात भिन्न स्वभावाचे लोक ही एकत्र येतात.

मैत्रीत सगळी गोसिप्स एकमेकांना माहित असते. दुर्गुण माहित असूनही जपलेले नातं मैत्रीच असतं.


मैत्री ही,

परिचयातून जुळून येते

विश्वासाने जपली जाते .

सुख दुःखात साथ देते , 

चुकांवर रागवणारी, अडचणीत पाठीशी असणारी, मैत्रीच असते.

यशात सामील होणारी,

अश्रूना गोठवणारी, डोळ्यातील भावना ओळखणारी मैत्रीच असते.

मैत्रीत ना रोज आठवण असावी,

ना रोज भेट व्हावी. पण मी तुला विसरणार नाही ही खात्री असते.

एकमेकांचा मान जपते, त्या दिवशी त्या मैत्रीच नातं आणखीनच घट्ट होतं.

निःस्वार्थ मनाने जवळ आलेला, आणि जीव लावणारी व्यक्ती म्हणजे मैत्री

मैत्रीला ना वयाची अट, ना वयाचं बंधन कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी जुळून आलेले ऋणानुबंध बंध हे मैत्रीचेच असतात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational