STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational

4  

VINAYAK PATIL

Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
366

विनायक आणि आमीर शेजारी होते. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते. एकत्र जायचे-यायचे. एकत्र अभ्यास करू पाहायचे पण त्यांच्या घरच्यांना मात्र ही मैत्री मान्य नव्हती. कारण त्यांचे धर्म वेगळे होते. दोघांच्या धर्मातला हा फरक त्यांच्या मैत्रीतही तेढ निर्माण करू लागला. पण त्या दोघांना मात्र हे मान्य नव्हतं. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपली मैत्री कायम ठेवली होती. एकदा दोघंही शाळेतून परत येत होते. विनायक रस्ता पार करत होता. समोरून एक गाडी भरधाव वेगात येत होती. आमीरने ते पाहिलं मग क्षणाचाही विलंब न लावता त्याने रोहनला बाजूला ढकलून दिलं आणि स्वतः त्या गाडी समोर गेला.


विनायकला साधंच खरचटलं होतं पण आमीरला मात्र चांगलाच मार बसला. लोकांनी दोघांना दवाखान्यात नेलं. तिथे दोघांचेही घरचे एकत्र आले. त्यांना आपली चूक समजली. विनायक आणि आमीरमधल्या ख‍ऱ्या मैत्रीची त्यांना खात्री पटली. त्या दिवसापासून फक्त हे दोघंच नव्हे तर त्यांची कुटुंबही एकमेकांचे मित्र बनले. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational