मैत्री आपली अजूनही
मैत्री आपली अजूनही
मैत्री आपली अजूनही कोमल छायेपरी,
आहोत आपण एकाच वाटेवर जोवरी
नकोत भिन्न भिन्न वाटा या जीवनी,
पसरत रहावा सुगंध असा हा मैत्रीमधूनी
मैत्री आपली ही असे नितळ प्रेमापरी,
कधी ना यावी या नात्यामध्ये अशी दरी
नकोत काही आशा नकोत काही अपेक्षा,
हवे काय दुसरे आम्हाला या मैत्रीपेक्षा
मैत्री आपली अजूनही कोमल छायेपरी,
आहोत आपण एकाच वाटेवर जोवरी
